Purpose of Tillus Agro Tourism

Our purpose is to build a place which connects back to our tradition, makes every visitor feel at their own farm, enjoy delicious village side food with family and friends and help them to relax and get ready for the next day.


आमचा उद्देश एक असे कृषी पर्यटन स्थळ तयार करणे आहे की जे आपल्याला आपल्या परंपरेशी जोडेल, प्रत्येकाला आपलेसे वाटेल, आपल्या कुटुंब व मित्र परिवारासोबत पारंपरिक गावरान जेवणाचा आस्वाद घेता येईल, शहरातल्या धावपळीतून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा ताजे तवाने होण्या साठी मदत करेल.

Advocate Prakash Namdeo Gaikwad (LLB, LLM)

अन्नदाता सुखी भवः असं का म्हणतात तर, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, विज्ञानाने काहीही प्रयोग यशस्वी केले तरी माणसाला जगण्यासाठी अन्नच लागते व ते अन्न कुठल्याही तंत्रज्ञानाने, मशीनने बनत नाही तर ते मातीतच शेती करून पिकते व माणुस जगु शकतो. सगळे जग, सगळ्या सुविधा बंद पडल्या तरी शेती व माती कधीच बंद पडत नाही हे कोरोनाच्या संकटामुळे सर्व स्तरातील लोकांना प्रकर्षाणे जाणवले आहे व लोकांचा कल शेती, माती, निसर्ग, आपला गाव याकडे वाढल्याचे आपण पाहतो , वाचतो व रोज ऐकतो आहे. सध्याच्या पिढीला शेतीची माहिती असणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे. जग कितीही बदलले तरी माणसाची नाळ या मातीशी सतत जोडलेली असते. कुटुंबाला हा अनुभव व उत्तम मनस्वास्थ्य द्यावे म्हणुन कृषी पर्यटन केंद्र उभा करून माणसाला माती व निसर्गाच्या सानिध्यात आणण्याचा आमचा छोटासा प्रयत्न.

आजच्या पिढीला जमीनीच्या मशागती पासुन ते पिक काढणी व त्यावर प्रक्रिया करून त्याचा अन्न म्हणुन कसा वापर होतो हे ज्ञान व्हावे आणि आपला पारंपारिक व सांस्कृतिक वारसा माहीत होणे व त्यावरच तंत्रज्ञान ही चालु आहे हे कळणे महत्वाचे आहे.

माती, पाणी, उजेड, वारा, झाडे, पशुपक्षी, ग्रामीण जीवन शैली, समाधानी व मेहनती वृत्ती या गोष्टींचा अभ्यास व विचार व्हावा हा आमचा प्रयत्न.

स्वातंत्र्यानंतर अनेक बदल झाले पण कोरोना ने सिद्ध केलेले अन्नाचे महत्व कोणीही गरीब श्रीमंत व्यक्ती विसरू शकत नाही.

शालेय विध्यार्थी ते सेवानिवृत्त अथवा वयोवृद्ध व्यक्ती सर्वांनीच या कृषी पर्यटन स्थळाचा आनंद ध्यावा व एक विलक्षण अविस्मरणीय अनुभव घ्यावा.

Shubhada Shailesh Gaikwad (Master in Computer Management, Yoga Practitioner)

देश विदेशातील अनेक ठिकाणी कौटुंबिक सहलीला गेल्यानंतर असे वाटले की आपल्या सोलापूरकरांसाठी एखादे छानसे पिकनिक डेस्टिनेशन बनवावे आणि सोलापूरकरांना कोठेही बाहेर न जाता कुटुंब व मित्रपरिवारा सोबत विविध गोष्टींचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही नवीन टिल्लूज अॅग्रो टुरिझम नावाचे पिकनिक डेस्टिनेशन सोलापूर पासून १० कि.मी. अंतरावर होटगी येथे बनवले आहे. येथे आपण पारंपरिक शेतकी वस्तू संग्रहालाय बनवले आहे. याठिकाणी आपण आपल्या मुलांना शेतकऱ्यांबद्दल व त्यांच्या गावातील राहणीमाना बद्दल अनुभव देऊ शकाल. तसेच आम्ही सर्व वयाच्या मुलांसाठी पारंपरिक व आधुनिक खेळांचे मैदान बनवले आहे आणि हो तुमच्यासाठी शेतकरी ते ग्राहक तत्वावर येथे माल विक्री ही चालू केली आहे. आम्हाला खात्री आहे की आपण येथे येऊन नक्कीच संस्मरणीय अनुभव घ्याल.